डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान… आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘बेस्ट इन्स्टिट्यूट इन मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ पुरस्कार स्वीकारताना डॉ. राजेश ख्यालप्पा, अजित पाटील.

कोल्हापूर – गेल्या तीन दशकाहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूरचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट इन मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आणि सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या जागतिक अध्यक्षा शायना एन. सी., अभिनेत्री हरनाज कौर संधू, ए. श्रीनिवास, ब्रजमोहन पांडे यांच्यासह वैद्यकीय व सामजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित ‘नवभारत हेल्थकेअर समिट २०२६’ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय सेवेमध्ये उत्कृष्टता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या कार्याचे विशेष कौतुक केले. १९८९ मध्ये कोल्हापूरमध्ये स्थापन करण्यात आलेल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३६ वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट वैदयकीय शिक्षण, डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव शिक्षण देत हजारो गुणवंत डॉक्टर्स घडवले आहेत. राज्याची व देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात या महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे. उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन महाविद्यालय सातत्याने नवनवे उपक्रम राबवून आरोग्य व्यवस्थेसाठी अखंड योगदान देत आहे. या कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. 

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी मेडीकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.