साई कॉम्प्युटरला उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे मिळाला मानाचा पुरस्कार
गारगोटी (प्रतिनिधी) – संगणक शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, उत्कृष्ट सेवा आणि विद्यार्थीकेंद्री कार्याचा गौरव म्हणून साई कॉम्प्युटर, गारगोटी यांना MKCL – MS-CIT Silver Jubilee Excellent Award 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान MKCL Network Leadership Meeting 2026 कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
भुदरगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत ‘Excellent Award 2026’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार साई कॉम्प्युटर गारगोटीच्या नावावर जमा झाला. यावेळी MKCL चे सीनियर जनरल मॅनेजर अमित रानडे, दक्षिण महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल गावंडे आणि कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख सचिन भोईटे यांच्या हस्ते साई कॉम्प्युटर गारगोटीचे केंद्र समन्वयक विजय सारंग यांनी पुरस्कार स्वीकारला.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
हा सन्मान संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण विश्वास आणि उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची पावती मानला जात आहे. या यशाबद्दल साई कॉम्प्युटर गारगोटीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार संगणक शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.

































































