काॅकरच जनता पार्टीला अनावृत्त पत्र…लोकशाही फक्त हक्क नाही… जबाबदारीही आहे!
सध्या CJP’काॅकरोच जनता पार्टी” हा परवलीचा शब्द झाला आहे.न्यायाधीशांनी जी टिप्पणी केली त्या वरून जो तरुणाईचा जोश या पार्टीचे फाॅलोवर बनले आहेत त्यांना माझे काही प्रश्न.
काॅग्रेस च्या राजवटीत भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल विधेयक इ.साठी समाजसेवक मा. अण्णा हजारेंचा जो वापर करून घेतला त्याच पक्षाशी संबंधीत हे परदेशस्थ भारतीय महाशय(तरूण)नाव घेणे जाणीवपूर्वक टाळले आहे. कारण आधी हे महाशय ज्या पक्षाचे सदस्य त्यांनी काय दिवे लावले हा ताजा इतिहास.

आताचा तरूणवर्ग सगळ्याच कोकरचपिढीतील तरूणवर्गासारखा तरूणाईच्या वाऱ्यावर स्वार असलेला, स्वप्नाळू व मोठ्या आशा अकांक्षा बाळगणारा तरूणवर्ग आत्मपरीक्षण करेल काय?
राजकीय पक्षांच्या निवडणूका, मोर्चे, बंद,दंगली व इतर कार्यक्रमात काही मोबदल्यात स्वत्व विसरलेला काही प्रमाणातील तरूणवर्ग निवडणूकीत जी पैशांची वा वस्तूंची जी खिरापत वाटली जाते त्याच्या मध्ये कसा सहभागी होतो.
सणसमारंभात दारू(ड्रिंक्स म्हणायच बर)त झिंगून नाच गाण्यात जो तासनतास वाया घालवतो ते सोडण्याची तयारी दाखवेल काय?
परिक्षेचे पेपर फूटी साठी जो पालकांच्या पैशाची लूट करतो ते थांबवेल काय?18वर्ष निवडणूकी साठी पात्र झाल्यानंतर तो मतदान करतो काय?जर लायक उमेदवार नसेल तर नोटा ऑप्शन निवडतो काय?समाजातील सेलीब्रेटी (पेज3)यांचे अंधानुकरण करत बसण्यापेक्षा व क्रिकेट मॅच कामधंदा सोडून तासनतास वाया घालवतो आपले नोकरी कुटुबिंय घरातील सिनीयर सिटीझन यांना काही वेळ देईल काय?आज अशी परिस्थीती आहे कि घरातील वृध्द व्यक्ती यांचशी बोलण्यास कोणीच नसल्याने वयोवृध्दांचे बोलणेचा जबडा उघडेना अशी वेळ आली आहे.

तरूणवर्ग पिझ्झा, बर्गर,चायनीज, मोमोज,शोरबा , कोल्ड्रिंक व अशाच जंकफूडचा आधीन झाला आहे ते थांबेल काय?ब्रॅन्डेड च्या नावाखाली परदेशस्थ वस्तूंचा, कपड्यांचा मोह टाळून देशी वस्तूंचा वापर करेल काय?
राजकारण ही सेवा आहे हा विचार करेल काय?व त्याठी निरिच्छ पणे समाजसेवेत उतरेल काय?साधा फाटकी चप्पल घालून आलेला इसम,व सेलीब्रेटी यांना एकाच तराजूत तोलेल काय?
आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही जेंव्हा म्हणता कि विद्यमान नेतृत्व हुकुमशाही वागते त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे कि आपले कुटुंब प्रमुखाचे आपण कुटुंब प्रमुख म्हणून आदर व त्यांचे छायेखाली, त्यांच्या मताचा आदर करतोच ना?एक कुटुंब चालवताना आपली दमछाक होते.आपल्या देशाची लोकसंख्या हा महत्वाच प्रश्न आहे.लोकशाही लोकशाही म्हणणार्या व संविधानाचे नाव घेणाऱ्यांना त्यातील हक्क कळतात मग जबाबदाऱ्या कळायला नकोत का?असे आणि बरेच काही आत्मपरीक्षण करावे असे मुद्दे आहेत.
देश प्रथम म्हणून आपले पालकांना ते विरोध करतात काय.जे तरूण म्हणून कुटुंब प्रमुखा आहेत ते घरात लोकशाहीचा (सर्वाःच्या मताचा आदर करतात काय?कि घरातील इतर सदस्यांना गृहीत धरतात घरात लोकशाही पाळतात काय?मग देश व विद्यमान नेतृत्व विरूध्द आपल्याला गळा काढण्याचा अधिकार आहे काय?माझे म्हणणे नाही कि विरोध करू नका जे चूकीचे निर्णय असतील त्यांचा अभ्यास करा, वस्तूस्थिती समजून घ्या व असहकार किंवा अहिंसेच्या मार्गाने विरोध करा. कारण जाळपोळ ,तोडाफोड यात सरकारी मालमत्तेचे नाही आपल्याच खिशातील कर रूपाने गेलेल्या पैसाचा चुराडा होतो.देशाचे नुकसान होते.
नेपाळ, बांगला देशात व श्रीलंकेत जे झाले ते करण्याची चूक करू नका त्या देशाची परिस्थिती राजकीय नेतृत्व व समाजकारण यांचा अभ्यास करा सध्या तिन्ही देशातील घडामोडी वर लक्ष ठेवा व स्वतःला समाधानकारक उत्तर देता आले तर सेवा म्हणून जरूर राजकारणात उतरा. आठवा अण्णा हजारे यांचे चळवळीचा फायदा घेणारे किती त्यांच्या
संपर्कात आहेत.अन्यथा आपले ही अण्णा हजारे होणार नाही याची दक्षता घ्या. तात्कालीक भावनेच्या वा कोणी फूस देतो म्हणून राजकारण रूपी मैदानात उतरताना स्वतः विद्यमान राजकारणात जे केवळ सत्ता व पैसा यासाठी साम,दाम,दंड भेद वापरतात त्यांच्यात व आपल्यात काही फरक रहाणार नाही. अन्यथा आपले अंतरगत अनागोंदीचा शत्रु राष्ट्रे गैरफायदा घेतील.
म्हणून नुसता फाॅलोवर म्हणून घेण्यापेक्षा जबाबदार नागरिक व्हा तेंव्हा वेळ आपलीच असते.
























































