|
जनसंपर्कात सत्य आणि नैतिकता महत्वाची – उपसंचालक प्रवीण टाके ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन कोल्हापूर: ‘कोरोना साथीनंतर जनसंपर्क क्षेत्र अधिक महत्वाचे झाले आहे पण विश्वासार्हता टिकवणे हेही आवश्यक झाले आहे. तसेच एआय टूलच्या वापरामुळे कामास गती मिळते मात्र आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ अधिकृत उदघाटन झाल्याचे प्रवीण टाके यांनी जाहीर केले. शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय)च्या कोल्हापूर चॅप्टर उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा.डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते. ही बातमीही जास्त वाचली —मुख्यमंत्री यांच्या हस्ते राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील २०० कोटींहून अधिक विकास कामांचे लोकार्पण…
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, माझगाव डॉकचे माध्यम सल्लागार पी.एस.पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे माधव जायभाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र पारिजात, जेष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या डॉ.वृषाली बर्गे, कणेरी मठाचे जनसंपर्क अधिकारी विवेक सिद्ध, तुतारी जाहिरात संस्थेचे संचालक सचिन मोरे, सरदार जाधव, विवेक पोर्लेकर, टिटवे कॉलेजचे दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, डायमंड हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुनील भस्मे आदीनी मनोगत व्यक्त केले.
|



























































