मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी दिला “स्वच्छ गड – सुंदर गड” असा संदेश
गारगोटी प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल, गारगोटी येथील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक गड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गड परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर टाकाऊ कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच ऐतिहासिक वारशाबद्दल आदर वाढावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गड – सुंदर गड” असा संदेश देत उपस्थित नागरिकांनाही गड परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या पार पडली असून परिसरात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पसरला आहे.

















































