पाेलीस तुमच्यासाठी… बाप्पा न्या बिनधास्त… तुम्ही रहा निर्धास्त

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पोलिस सज्ज… बाप्पाच्या आगमनाला वाहतुकीत बदल

कोल्हापूर :
२७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गणेश मूर्ती आगमन सोहळ्यासाठी कोल्हापूर शहर वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत. बाप्पाला तुमच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी खास वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

  • शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी (गंगावेश), बापट कॅम्प परिसरात वाहतुकीत बदल.

  • नो पार्किंग : गवत मंडई परिसर (५० मीटर अंतरात).

  • ️ पार्किंग सुविधा :

    • आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल पटांगण,

    • शाहूपुरी ४ व ५ गल्ली,

    • प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर (बापट कॅम्प),

    • गुरु नानक सोसायटीची रिकामी जागा.

सकाळी ७ वाजल्यापासून मिरवणूक पूर्ण होईपर्यंत या मार्गांवर प्रवेश बंद राहील.

आवाहन –
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे म्हणाले –
“पोलिस तुमच्या बाप्पासाठी रस्ता मोकळा करून देत आहेत. तुम्हीही नियम पाळा, पोलिसांना सहकार्य करा. बाप्पा आनंदात साजरा करा आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.