पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील जनतेसाठी न्यायदानाचे नवे पर्व ठरणारे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीट बेंच मंजूर करण्यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई जी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार जपत दाखवलेली तत्परता कोल्हापूरकर कधीच विसरणार नाहीत.
आज त्यांच्या हस्ते कोल्हापूर सर्कीट बेंचचे उद्धाटन होत आहे. तत्पूर्वी सर्किट हाऊस येथे त्यांची भेट घेऊन कोल्हापूरकरांच्या वतीने सत्कार केला . त्यांच्याशी झालेल्या संवादातून कोल्हापूरबद्दल त्यांची असलेली आत्मियता आणि जिव्हाळा मनोमन जाणवला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक उपस्थित होते.
माझे वडील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील आदरणीय माजी खासदार स्व. रा. सु. गवई साहेब हे जिवलग मित्र होते, ही हृदयाला स्पर्श करणारी आठवण स्वतः सरन्यायाधीशांनी कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनाच्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावरून प्रेमपूर्वक सांगितली. या नात्याचा उल्लेख करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी भावनिक ऊब जाणवली. तसेच कोल्हापूरातील स्वागताने भारावून गेल्याचेही त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
आमदार सतेज पाटील, काँग्रेस गटनेते, विधान परिषद
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.