प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा! संगमेश्वर स्थानकावर मुजोर स्टॉलधारकाचा धुमाकूळ — अस्वच्छतेचा थर, कारवाईचा बोजवारा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मिलिंद चव्हाण, कडवई

संगमेश्वर —गणेशोत्सवाच्या तोंडावर संगमेश्वर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि कोकण रेल्वे प्रशासन हातावर हात धरून बसले आहे! पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्स गटाराच्या कडेवर उघड्यावर ठेवणे — हा प्रकार पाहून प्रवाशांनी जाब विचारला, तर स्टॉलधारकाने संतापाचा पारा चढवत थेट अंगावर धाव घेत अरेरावी केली.

कारवाईचे आश्वासन फसवे?
प्रवाशांनी व पत्रकारांनी हा प्रकार विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी “दोन दिवसात कारवाई”चे आश्वासन दिले. पण पंधरा दिवस उलटूनही काहीच झाले नाही! मग प्रश्न उभा राहतो — कोकण रेल्वे प्रशासन मुजोरांना पाठीशी घालतेय का?

स्टॉल वाटपात गडबड – कोकणकरांना फसवणूक
रेल्वे स्थानकावरील स्टॉल प्रकल्पग्रस्तांना देणे बंधनकारक असताना, ते ‘मर्जीतील’ लोकांना देऊन नंतर परप्रांतीयांच्या ताब्यात सोपवले जात असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. मंजूर व्यवसायाऐवजी इतर धंदे सुरू असलेले प्रकार लपवले जात आहेत.

संगमेश्वरचा वादग्रस्त स्टॉल
स्थानकावरील एक चहा स्टॉल कोकणी माणसाच्या नावावर, पण प्रत्यक्षात परप्रांतीयाच्या हाती. त्याची मुजोरी, अस्वच्छ स्वयंपाक, निकृष्ट दर्जाचे पदार्थ — सगळं उघडपणे सुरू. गटारावर ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्स पाहून प्रवाशांनी विरोध केला तर “जे करायचे ते करा” असा सरळ पवित्रा. पत्रकारांशी देखील हुज्जत.

गणेशोत्सवापूर्वी तणाव
राजकीय नेत्यांच्या कानावर हा विषय गेल्याने गणेशोत्सवापूर्वी संघर्षाचे सावट गडद झाले आहे. प्रवासी ठाम — “हा मुजोर हटवा, आणि कोकण रेल्वेतील सर्व स्टॉलची चौकशी करा!”

प्रवाशांचा इशारा — प्रशासनाने डोळेझाक सुरू ठेवली, तर हा मुद्दा रस्त्यावर नेला जाईल. कोकणकर आपल्या आरोग्याशी तडजोड करणार नाहीत!

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.