कारण किरकाेळ… मर्डर केला… मात्र पाेलिसांनी बारा तासात पकडले… काय चाललय काेल्हापुर जिल्ह्यात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

किरकोळ कारणावरून खून करणारे तिघे आरोपी अवघ्या १२ तासांत जेरबंद!

कोल्हापूर,  : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करून पसार झालेल्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केवळ १२ तासांत शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कौतुकास्पद कामगिरी पार पडली.दि. ६ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात अक्षय दीपक चव्हाण या तरुणाचा यश काळे व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता. फक्त एकमेकांकडे बघण्यावरून झालेल्या वादातून या खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मृताचे भाऊ दिग्विजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मा. अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकांना सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने तपासाला वेग दिला. अमलदार संजय कुंभार व सागर माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी शिरोली एमआयडीसी परिसरात काळ्या अ‍ॅक्टिव्हा गाडीवर लपून बसले होते. पथकाने पाच तास परिसरात पाळत ठेवून शोधमोहीम राबवली. अखेर शिये फाटा रोडवर संशयितांची अ‍ॅक्टिव्हा गाडी (MH-11/BQ-8269) दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी शिताफीने तिघांनाही पकडले.

तपासात या तिघांनी मयत अक्षय चव्हाण याच्यावर पूर्वीच्या किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

या यशस्वी कामगिरीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच अमलदार संजय कुंभार, सागर माने, प्रकाश पाटील, वसंत पिंगळे, महेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सर्जे, अशोक पवार, विशाल चौगुले, लखन पाटील, रोहित मर्दाने, सतीश सूर्यवंशी आणि हंबीरराव अतिग्रे या सर्वांची विशेष कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीला वचक बसवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल सदैव दक्ष आहे, असे पोलिसांनी सांगितले.

अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
१) यश सुनिल काळे (१९, कुरुंदवाड)
२) अमन जमीर दानवाडे (२२, इचलकरंजी)
३) श्रीजय बाबू बडसकर (२२, औरवाड, शिरोळ)

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.