पोलीस दलाच्या आरोग्याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे…पाेलीस सशक्त तर समाज सक्षम

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व IMA यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य तपासणी शिबिराला पाेलिसांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर – मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोशिएशन (कोल्हापूर शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन लिपिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्याला पाेलीस कर्मचारी, अधिकारी, कुटुंबियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

हे शिबिर पोलीस मुख्यालय, अलंकार हॉल, कोल्हापूर येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रस्ताविक सादर करत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकला.

  • इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी डॉक्टर आणि पोलीस हे दोघेही वेळेचे बंधन न पाळता सेवा देणारे घटक असल्याचे सांगून, तणावमुक्त राहण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार व आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पोलीस दलाने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत इतर विभागांनीही अशीच शिबिरे राबवावीत, असे मत व्यक्त केले.

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून घेणे हा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची तपासणी हा एक अभिनव उपक्रम आहे. त्यांनी पुढील काळात इतर शासकीय विभागांमध्येही अशा प्रकारचे व्यापक कार्यक्रम राबवण्याचे सूचवले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

शिबिरात हृदयरोग, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, यूरोलॉजी, दंतचिकित्सा, पॅथॉलॉजी इत्यादी तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण ३९९ पोलीस अधिकारी, अंमलदार, लिपिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक सुरजितसिंह राजपूत (मोटार परिवहन विभाग), राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी (कल्याण शाखा), तसेच IMA चे पदाधिकारी, डॉक्टर्स, पोलीस अंमलदार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.