कामगार दिनाला मानवतेचा स्पर्श — नागाव ग्रामपंचायतीचा सन्मानार्थ उपक्रम

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने कामगार दिनाचा आत्मा

हातकणंगले (रुपेश आठवले) – नागाव ग्रामपंचायतीने जागतिक कामगार दिनाला एक वेगळा अर्थ दिला — सत्तेच्या खुर्चीतून नव्हे, तर समाजाच्या पाया असलेल्या श्रमिकांच्या सन्मानातून. ग्रामपंचायतीने गावातील घंटागाडी चालक विक्रम जयपाल कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजाला मोलाचा संदेश दिला.

हा क्षण विक्रम कांबळे यांच्यासाठी केवळ अभिमानाचा नव्हता, तर त्यांच्या जीवनातील एक असामान्य वळण होता. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही कृती ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या विचारांची उंची दाखवणारी ठरली. काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने कामगार दिनाचा आत्मा.

कार्यक्रमाला सरपंच विमल शिंदे, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.