*चिपळूण पालिकेच्या खताला हरित महासिटी कंपोस्टस ब्रँड प्राप्त!*
शहरातील शिवाजीनगर येथील नगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कच-यापासून सेंद्रीय खत निर्मिती केली जात आहे. या खताला शासनाकडून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड प्राप्त झाला आहे. यामुळे नगर परिषदेस आता आपल्या खताची मार्केटींग आणि अधिकृत विक्री करता येणार आहे.
चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दैनंदिन सुमारे 6-7 टन इतका ओला कचरा निर्माण होत आहे, निर्माण होणारा ओला कचरा नगर परिषदेच्या घंटागाडी मार्फत वेगळा जमा केला जात असून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर चिपळूण नगर परिषदेच्या शिवाजी नगर येथे असलेल्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावर असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीन व बायोगॅस द्वारे प्रक्रिया करणेत येत आहे.
“शरीर-मन सशक्त करणाऱ्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव”
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
या प्रक्रियेद्वारे सेंद्रीय खत व विज निर्मिती केली जात आहे. तयार झालेल्या खताची तपासणी करणेकमी खत नियंत्रण प्रयोगशाळा, कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते त्यानुसार खत तपासणी अहवाल प्राप्त झाला होता. सदर अहवाल राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी मुंबई यांचेकडे हरीत ब्रँड साठी पाठविण्यात आला होता.
राज्य अभियान संचालक सो यांचेकडून खत तपासणी अहवालाची छाननी केली गेली. हरीत ब्रँड साठी लागनारी सर्व गुणांकने FCO मानकानुसार बसत आहेत. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेकडे असणाऱ्या खतास शासन स्तरावरून दि 17रोजी हरीत महासिटी कंपोस्ट ब्रँड प्राप्त झाला आहे.
ही बातमी देखील अधिक वाचली गेली
निसर्गाच्या सानिध्यात अक्षरांचे मैत्र! ‘वाचू आनंदाने’ उपक्रमाने चिपळूणमध्ये रंगला वाचनसोहळा
हा ब्रॅण्ड प्राप्त झाल्यामूळे नगर पालिकेकडून तयार करणेत आलेल्या खताची विक्री केली जाणार आहे. तरी नागरिकांना खत पाहिजे असल्यास पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यााधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































