सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे दर्जेदार करावीत – प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्ह्यातील सुरु असलेल्या कामांची  राज्याने दखल घ्यावी असे आदर्शवत काम व्हावे…

कोल्हापूर – सध्या जिल्ह्यात विविध विभागांमार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. सुरु असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत जेणे करुन राज्यात कोल्हापूरचा नाव लौकिक अधिक उंचावेल. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी आढावा बैठक घेतली. ते पुढे म्हणाले, मार्च २०२६ पर्यंत या सुरु असलेल्या इमारती पुर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने कार्यरत रहावे. मात्र हे करत असताना त्यांनी त्याच्या गुणवत्तेकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. सर्व विभागांनी आपआपसात समन्य ठेवावा. जिल्ह्यातील सुरु असलेल्या कामांची संपुर्ण राज्याने दखल घ्यावी असे आदर्शवत काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे, प्रादेशिक मनोरुग्ण रुग्णालय, सांगाव (कागल) येथील वैद्यकीय महाविद्यालय, श्री क्षेत्र आदमापूर येथील विकास आराखडा, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय इमारत देखभाल व दुरुस्ती त्याचबरोबर शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी वैद्यकीय महाविद्यालय इमारत, वसतीगृह, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच सारथीची इमारत आदी बाबत त्यांनी दीर्घ आढावा घेतला. लवकरच बाळूमामाच्या यात्रेला सुरुवात होत असून यावेळस भाविकांची गैरसोय होवू नये याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी सूचना करुन, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे अधिकचा निधी मागू असे ही सांगितले.

या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, बी. एल हजारे, सी. ए. आयरेकर, महेश कांजर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, कार्याध्यक्ष रागिणी खडके बाळूमामा देवालय तथा निरीक्षक धर्मादाय सह आयुक्त, इफ्तेकार मुल्ला, बाळुमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांच्यासह जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व उप अभियंता तसेच पोलीस विभागातील संबंधित अधिकारी उपस्थितीत होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.