CRIME- LCB ने केला असा आव्हानात्मक गुन्ह्याचा उलघडा… अंडरवेअरने पाेहाेचवले गु्न्हेगारापर्यंत

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डोके धड नसलेल्या मृतदेहाचा आठ महिन्यांनी छडा
कोल्हापूर LCB चे यश

कोल्हापूर: शहरातील हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यामध्ये आठ महिन्यापुर्वी सापडलेल्या डोके नसलेल्या धडाचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. हा गुन्हा दिनांक 4 एप्रिल रोजी घडला होता. शहरातील हुतात्मा पार्क येथे महापालिकेच्यावतीने जयंती नाल्यात जेसीबीने गाळ काढण्याचे काम सुरू होते. यावेळी  एक पुरुष जातीचे,35 ते 40 वर्षीय डोके नसलेले, सडलेल्या अवस्थेतील धड सापडले. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाणेस अकस्मात मयत अशी करण्यात आली होती. सापडलेल्या मृतदेहाचे नाव

या घटनेचा राजवाडा पोलीस ठाणेकडून पुढील तपास चालु होता. धडास डोके नाही. अंगावर कपडे नाही. धड सडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे पोलिसांसह कोणालाच त्याची ओळख पटने अशक्य होते. नाल्यातील गाळ काढताना जेसीबीमुळे मृतदेहाचे डोके कट झाले असावे, असा प्राथमिक अंदाज होता. त्यावेळी मयताच्या डोक्याचा नाला परिसरात शोध घेवूनही मयताचे डोके सापडले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्या दृष्टीने तपास सुरू झाला. परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांंच्यासह पाेलिसांना तपासाचे आदेश दिले.त्यानुसार एलसीबीने तपासाची चक्रे वेगाने फिरवित,  आवश्यक ती  माहिती मिळवित, तपासाला दिशा दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

राजवाडा पोलीस ठाण्याबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सदर मयताचा समांतर तपास करण्यात आला असता. अखेर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, संतोष बरगे, प्रविण पाटील, महेंद्र कोरवी व प्रदिप पाटील यांची दोन तपास पथकाच्या माध्यमातून हा तपास सुरू झाला.

अंडरवेअर च्या नंबर वरून काढला शोध

पथक तपास करीत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेतली. धडाचे अंगावरील फक्त अंडरवेअरचे कंपनी वरून पथकाचा शोधाशोध सुरू झाला . यात यश मिळाल्यानंतर नातेवाईकांचा शोध घेण्यात आला असता, सदर मयत व्यक्ती अशोक पाटील, (रा. पिशवी, ता. शाहुवाडी) असल्याची माहिती मिळाली. मयताचे नातेवाईकांच्याकडे तपास केला, परंतु सदर मयताचा कोणी घातपात केला नाही, अशी अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे पुन्हा तपासाची चक्र वेगाने फिरली. परंतु पथकाने सदर तपासामध्ये सातत्य ठेवून धड सापडलेल्या परिसरामध्ये साध्या वेशात वावर ठेवून गुप्तपणे माहिती काढण्यास सुरवात केली.

साध्या वेषात पाळत ठेवली नि हेरले!

डवरी वसाहत मधील रावण उर्फ अजय शिंदे व त्याचे दोन मेव्हणे तसेच त्याचे इतर साथीदार यांनी हुतात्मा पार्कमध्ये एका व्यक्तीचा खुन करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले व मुंडके गाळामध्ये पुरले आहे. ‘अशी गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाला मिळाली मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकारी व पथकाने माहिती घेतली असता, ज्या दिवशी सदर मयताचे धड मिळून आले त्याच दिवशी दिनांक 04एप्रिल रोजी सायंकाळी 05.00 वा.चे सुमारास रंकाळा चौपाटी येथे रावण उर्फ अजय शिंदे वाचा निर्गुण खुन झाला होता. त्यानंतर रावण उर्फ अजय शिंदे याचे मेव्हुणे व इतर साथीदार यांचा नेहमी वावर कोठे असतो, ते काय काम करतात व ते सध्या कोठे आहेत याची पथकाने गोपनीयरित्या माहिती घेतली.

रत्नागिरी येथून अटक
सविस्तर सर्व माहिती जमा होताच व सर्व खात्री झाले नंतर,त एकाच वेळी रत्नागिरी,₹ डवरी वसाहत, कळंबा) येथुन ताब्यात घेवून त्यांना वेगवेगळे ठेवून तपास केला असता सदर प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे प्रथम सांगितले. आरोपी खोटे बोलत असून पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर, पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच सत्य बाहेर आले. आरोपींना पुन्हा विश्वासात घेवून, त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीनी संगणमताने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपींनी दिली अशी माहिती:
संशयित आरोपी अतुल शिंदे याने अशी माहिती दिली की, रावणचा खुन होण्याचे आधी 15 दिवसांपुर्वी अभिषेक शिंदे हा रात्रीच्या वेळी हुतात्मा पार्क गार्डनमध्ये बसला होता. त्यावेळी अभिषेक व मयत अशोक पाटील या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी अभिषेकने आकाश, अजित उर्फ रावण, अतुल शिंदे, सुरज माळी व ओंकार माने यांना बोलावून मयत व्यक्तीच्या मानेवर एडक्याने वार करून ठार केले. त्यानंतर मृतदेह उचलुन नाल्यामध्ये नेवून मयताची ओळख पटू नये तसेच आपण पकडले जाऊ नये म्हणून नाल्यातच त्याचे मुंडके एडक्याने कापुन टाकले, त्यानंतर अंगावरील कपडे काढून नाल्यात फेकली, धड पुलाचे खाली नाल्यात गाडले. व मुंडके तिथुनच काही अंतरावर नाल्याचे कडेला गाळात पुरून पुरावा नष्ट करून तेथुन निघूण फरार झाले.

आरोपींची नावे अशी:

 आव्हानात्मक गुन्ह्यात निष्पन्न झाले आरोपी व यांची नावे व पत्ते
**अभिषेक मंजुनाथ माळी, वय 20 वर्षे,
**अतुल सुभाष शिंदे, वय 23 वर्षे, दोघे रा. डवरी वसाहत. यादव नगर, कोल्हापूर
**अजय उर्फ रावण दगडु शिंदे, वय 25 वर्षे, रा.डवरी वसाहत, यादव नगर, कोल्हापूर [मयत] व इतर 03 अल्पवयीन मुले.

रात्री उशिरापर्यंत राजवाडा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा तपास यशस्वी रित्या पूर्ण केला.या पथकात सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे. पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी. प्रविण पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, सुशिल पाटील, कृष्णात पिंगळे व नामदेव यादव यांचा समावेश होता.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.