हेरले भारतीय जनता पार्टी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

हेरले भारतीय जनता पार्टी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

शिरोली:(रुपेश आठवले) हेरले तालुका हातकणंगले भारतीय जनता पार्टी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 68 महापरिनिर्वाण निमित्त विनम्र अभिवादन.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण बिपिन आलमान यांनी केले व अनुसूचित जाती जमातीचे तालुक्याचे उपाध्यक्ष विनोद कुरणे यांनी मेणबत्ती लावून व फुले वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सामुदायिक पंचशीला प्रार्थना म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना मनातून अभिवादन केले .त्यावेळी बिपिन आलमान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल विचार व्यक्त केले .

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

6 डिसेंबर हा दुःखाचा दिवस आहे भारत हा करोड लोकसंख्या असणारा देश या दिवशी पोरका झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम ओबीसी साठी कायदा केला . मतदानाचा अधिकार कामगारांचे बारा तासाचे आठ तास करणे, पीएफ फंड चालू करणे, महिलांना नोकरीत सुट ,रिझर्व बँकेची स्थापना अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

भारतीय जनता पार्टीचे विश्वजीत भोसले, अनिल उपाध्ये, सुधीर परमाज, उदय भोसले, अमोल मुंडे, सचिन तेरडाळे, सौरभ जाधव, जालिंदर उलसर, राजू कटकुळे ,चेतन करके ,श्रीकांत कांबळे ,बाबासो कांबळे, शशिकांत कांबळे, व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.