अखेर, छत्रपती शिवाजी महाराज विद्दुत रोषणाईने झळकले, का व कसे बघा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अन.. छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजाळला

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथील अर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असणारे लाईट बंद पडल्याने गेले काही दिवस पुतळा अंधारामध्ये होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांना दिली.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी याची तात्काळ दखल घेत पुतळ्याभोवती असलेली विद्युत रोषणाई तात्काळ बदलायच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील विद्युत रोषणाईच्या कामाची दुरुस्ती करून नवीन दिवे बसविण्यात आले. यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा व परिसर पुन्हा एकदा विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या कार्यतत्परतेबाबत नागरिकांमधून समाधान होत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.