अभिजीत माळगे यांचे हृदयविकारक च्या धक्क्याने निधन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
चोकाक तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजीत माळगे यांचे हृदयविकारक च्या धक्क्याने  निधन
हातकणंगले- 
चोकाक तालुका हातकणंगले येथील रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आयटी सेल उपाध्यक्ष व हातकणंगले तालुका महा-ई-सेवा केंद्राची सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी हृदयविकाराने हैदराबाद येथे दुःखद निधन झाले. अभिजीत माळगे हे हैदराबाद येथे ट्रीप साठी आपल्या कुटुंबाबरोबर गेले होते.
तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याचे तेथे निधन झाले. ते आपल्या महासेवा केंद्रातून गोरगरिबांची कामे करून देत असत. सामान्य नागरिक व गरजू लोकांचे काम  ते  विनामूल्य करून देत असत. समाजात वावरत असताना त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. प्रत्येकाला आपुलकीने व प्रेमाने त्यांची वागणूक असे. त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगी एक मुलगा व बहीण असा परिवार आहे . त्यांचा रक्षा विसर्जन रविवारी दिनांक 17 /11 /2024 इ रोजी चोकाक येथे सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.