CRIME-साेन्याचा हार जप्त… LCB ची आणखी एक यशस्वी कामगिरी!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

काेल्हापूर- येथील स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेने चोरट्यांची धरपकड करताना आणखी एक यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. एका पाठाेपाठ एक कारवाईची माेहीम आखताना साफळे रचून, खबऱ्यांकडून माहिती घेत एलसीबी विभागाने आणखी एका महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. ती महिला चक्क रेकाँर्डवरील गुन्हेगार असल्याचे समाेर आले आहे. तिच्याकडून तब्बल २ लाख १० हजार  रुपये किंमतीचा २७ ग्रंँम सोन्याचा धनहार जप्त करण्यात आला आहे. ज्योती उर्फ जोताबाई नामदेव पाटील (वय.६६, रा. संभाजीनगर, नांदणी रोड, लक्ष्मी नारायण हायस्कुल शेजारी, जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे त्या महिलेचे नाव आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाचे पाेलीस निरीक्षक रविंद कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या माेहिमेला पाेलीस अधिक्षक महेंद पंडीत यांनी मार्गदर्शन केले.

महेश खोत व शुभम संकपाळ यांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाने साफळा रचला. यावेळी रेकॉर्डवरील महिला गुन्हेगार ज्योति उर्फ जोताबाई नामदेव पाटील हिने वडगांव बाजार समिती, इचलकरंजी येथे  एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा धनहार चोरला  हाेता. ताे हार मंगळवारी २१ रोजी ताराराणी चौक, कोल्हापूर येथे चोरलेला  विकण्यासाठी येणार हाेती. याच माहितीच्या आधारे, पथकाने कोल्हापूर येथे सापळा लावला असता जोताबाई पाटील ह्या हातात प्लस्टिकची पिशवी घेवुन येत असल्याच्या दिसुन आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून गुन्हायाची कबूली देण्यात आली आहे. चोरीची खात्री झाल्यानंतर एलसीबी विभागाने  आरोपी महीलेस ताब्यात घेवुन जप्त मुद्देमालासह चाेरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

ही कारवाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार महेश खोत, शुभम संकपाळ, संजय कुंभार, महेश पाटील, सुशिल पाटील, कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, महीला पोलीस अंमलदार धनश्री पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या दाेन आठड्यात सलग यशस्वी कामगिरी पार पाडताना, पाचवी चोरी पकडण्यात यश मिळविले आहे. त्याबद्दल काेल्हापूर शहर नागरिकांच्यावतीने त्यांच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केले जात आहे. 

 

 

 

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.