कोल्हापुरातून “वंदे भारत”ची शानदार सुरवात! 35 मिनिटात मिरजेत

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू टरमीनल्स येथून सोमवारी सायंकाळी 4.20 ला वंदे भारत पुण्याकडे रवाना झाली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने यांच्यासह सत्यजित कदम, विजय जाधव, रूपाराणी निकम , राहुल चिकोडे, शिवनाथ बियानी व रेल्वेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 4.20 ला कोल्हापुरातून निघाली आणि 
4.55 ला मिरजेत पोहचली. 
कोल्हापूर मुंबई वंदे भारत ही रेल्वे देखील लवकरच सुरू होईल त्यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील असे केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री व्ही. सोमन्ना यांनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले. खासदार धनंजय महाडीक यांनी कोल्हापूर मुंबई एक्सप्रेस सुरू करावी, तर खासदार शाहू महाराज कोल्हापूर बंगळुरू ही देखील रेल्वे सुरू करावी अशी मागणी  व्ही. सोमन्ना यांच्याकडे केली. एकूण 530 क्षमता असलेल्या या वंदे भारत मधून शाळेतील मुले, व्हीआयपी, राजकीय व्यक्ती, पत्रकार, सोशल मीडिया च्या प्रतिनिधीनी मिरज तसेच पुण्यापर्यंत प्रवासाचा आनंद लुटला. अखेर तीन वर्षाची वंदे भारत च्या मागणीची प्रतिक्षा संपली. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. रेल्वेच्या सर्व पदाधिकारीवर्गाने सर्वांचे आत्मीयतेने स्वागत केले. यावेळी गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी रेल्वेचे पदाधिकारी प्रभातरंजन, व्ही, के सिंग, डॉ रामदास भिसे,विकास श्रीवास्तव, जयेश ओसवाल, शिवनाथ बियानी  उपस्थित होते.

ढोल ताशा,आणि तुतारीच्या गजरात,प्रमुख मान्यवर यांच्यासह उपस्थितांचे फेटे बांधून “वंदे भारत” चे स्वागत करण्यात आले. वंदे मातरम, वंदे भारत च्या गजरात प्रवाशांनी जल्लोष करत रेल्वे फ्लॅटफॉर्मवरून पुढे सरकली. रेल्वे फ्लॅटफॉर्मच्या दुतर्फा असंख्य प्रवाशी, नागरिकांनी, तरुणाईने आपल्या मोबाईलमध्ये वंदे भारत चा शानदार नजराना आणि वेग कैद केला. यावेळी ही वंदे भारत मुंबई पर्यन्त लवकर न्यावी अशी मागणी केली. 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.