तब्बल 24 वर्षानंतर भरला… वर्ग मित्र-मैत्रिणींचा संस्काराने भरलेला… माणुसकीचा व स्नेहबंधाचा वर्ग…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शुभांगी पाटील

आमची शाळा आमचा अभिमान… श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे आमची शान…

चंदगड – 12मे 2024 या जागतिक मातृदिनी, खरंच आज 24 वर्षानंतर माझ्या वर्गातल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. कार्यक्रमाचे संयोजन करताना अनंत अडथळे आले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर व माझ्या मित्रांच्या टीमवर्कच्या जोरावर खूपच सुंदर कार्यक्रम झाला. आपल्या दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुद्धा मित्र-मैत्रिणींनी आजचा दिवस खास साजरा केला.

या कार्यक्रमासाठी खास सुट्टी घेऊन पुण्या मुंबईहून आलेले बरेचसे मित्र घरात अनेक प्रकारची जबाबदारी व काम असताना सुद्धा कोणतीही कारण न सांगता थेट स्नेहमेळाव्यास उपस्थित झालेल्या माझ्या अनेक वर्ग मैत्रिणी व्हाट्सअप च्या माध्यमातून व फोनवरून संपर्क करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारे माझे सगळेच मित्र आपल्या दिलखुलास मनोगतातुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुढील आयुष्य नव्या उमेदीने जगण्यासाठी काही मित्रांनी यशाचा मूलमंत्र दिला. अनेक माझ्या मित्र-मैत्रिणी माणुसकी व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आयुष्यात संकटाशी सामना करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांच्या भावना आपुलकीचा सहवास खरंतर यावेळी आपल्याला घडवणाऱ्या अनेक गुरुवर्य यांची आठवण सुद्धा झाली.

पुढच्या वेळी सर्वाना निश्चित आपण बोलून सर्वांचा सन्मान करूया काही काळासाठी आपण सर्वजण मैत्रीच्या एका वेगळ्या विश्वात होतो याचा मला सार्थ अभिमान वाटला. काही मित्र-मैत्रिणींना वेळेत संपर्क होऊ न शकल्याने किंवा त्यांच्या काही घरगुती अडचणीमुळे ते हजर राहू शकले नाहीत.

यापुढील काळात सर्वांनीच हा मैत्रीचा स्नेहबंध जोपासूया पुढचा स्नेह मेळावा यापेक्षाही चांगला करूया श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे दहावी बॅच 2000 तरीही ते आमच्या स्मरणात आहेत. पुढील स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहतील व या खास सोनेरी क्षणांचे साक्षीदार होतील.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.