पाेर्ले येथे सभा… सत्यजीत पाटील यांना विजयी करू- कार्यकर्त्यांचा निर्धार, मतदारांना आवाहन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पन्हा

पोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

पन्हाळाःउद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील मशाल चिन्हावर लढत असलेल्या सत्यजीत पाटील आबा यांना विजयी करा, असे आवाहन सौ. प्राजक्ता सत्यजित पाटील यांनी केले. पोर्ले तर्फ ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. विकासाची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु करूया असे त्या पुढे म्हणाल्या. अध्यक्षस्थानी पन्हाळा तालुका प्रमुख बाबासो पाटील होते.
यावेळी बोलताना ऍड. विजयसिंह पाटील यांनी आबांना सर्वदूर मिळणारा प्रतिसाद विजयाची नांदी असल्याचे सांगीतले. माजी सभापती संजय चावरेकर यांनी मूलभूत सुविधा गावागावात आणण्यासाठी आपला खासदार असणे आवश्यक आहे असे सांगीतले. उपतालुका प्रमुख सौ. कोमल तांदळे यांनी उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सत्यजीत पाटील यांना खासदार म्हणून संधी द्या असे सांगीतले.  तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी मशाल चिन्ह सर्वापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले .
यावेळी तालुका प्रमुख सौ चंद्रभागा चौगुले, उप तालुका प्रमुख सौ माया चौगुले, अंगद शेवाळे, एन टी चौगुले, नंदू गुरव, संदीप चौगुले आर डी नांदगावकर यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.