जिल्हांतर्गत बदलीचा आदेश लवकरच कोल्हापूर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांची माहिती…
मुंबई – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते उदय शिंदे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर शिक्षक समितीचे समितीचे उपाध्यक्ष आनंदा कांदळकर व कोल्हापूर शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे कोषाध्यक्ष सुनील कुंभार सर शाहुवाडी तालुका अध्यक्ष युवराज काटकर सर, शिक्षक नेते पंडित भुरले सर आणि प्रभाकर गंगाधरे यांनी आज जिल्हांतर्गत बदल्यासाठी मंत्रालयात भेट घेतली.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिष्टमंडळाला भेट दिली. सर्व मते ऐकून घेतली आणि पोपटराव देशमुख उपसचिव ग्रामविकास यांना कॉल करून कोणत्याही परिस्थितीत जिल्हांतर्गत बदल्या झाल्या पाहिजेत असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर त्यांनी आपले एक पत्र बनवून दिले सदर पत्र घेऊन पोपटराव देशमुख यांची भेट घेऊन. त्यांना रँडम, विस्थापित, दुर्गम अंतर जिल्हा बदलून आलेले आणि बदली इच्छुक या सर्वांची बदली प्रक्रिया राबवली पाहिजे असे सांगितले. त्यांनी दोन दिवसात माननीय ग्रामसचिव यांच्याशी चर्चा करून पत्र काढले जाईल असे अभिवचन दिले. कोणत्याही परिस्थितीत पत्र काढले जाईल असे अभिवचन शिक्षक समितीने देशमुख यांच्याकडून घेतले. तिथून शिष्टमंडळ ग्रामविकास खाजगी सचिव अभय धांडे साहेब यांना भेटले. धांडे यांनी सुद्धा भरतीपूर्व शिक्षक बदल्या करण्यासाठी आपण तशा प्रकारची चर्चा लवकर घडवून आणली जाईल आणि शिक्षकांना सोयीच्या शाळा दिल्या जातील. शिक्षक आनंदी राहावा यासाठी नेहमीच ग्रामविकास शिक्षकांच्या बाजूने असेल असेही सुतोवाच्च धांडे यांनी केले.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर, पी. डी. देशमुख व खाजगी सचिव ग्रामविकास अभय धांडे यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आभार मानले गेले.