विनायक जितकर
पूर्णत: वाहतूक बंदी… (मार्ग तळेरे – वैभववाडी – गगनबावडा – कळे – कोल्हापूर)
कोल्हापूर – उपोद्घातातील वाचले ३ अन्वये कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांनी तळेरे गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी प्या करूळ घाटातील २५,३०० किमी ते ३०,३०० किमी या ५ किमी भागात दुपदरीकरणाचे काम १५/०१/२०२४ ते ३१/०३/२०२७ या कालावधीत करण्यात येणार असून, सदर करुळ घाटात एकेरी वाहतूक चालू ठेवणे शक्य नसून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कारण सदर घाट भागात रस्ता जेमतेम ७.०० मी. रुंदी आहे. तसेच सदर रस्ता तीव्र चढ-उतार, वेडीवाकडी धोकादायक वळणे, अवजड वाहने, ट्रेलर यांची वर्दळ असून या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही धोकादायक ठरेल.
तसेच डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण दरीकडील बाजूस संरक्षक मित बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होणेकरिता १५.०१.२०२४ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग के १६६ जी वरील सर्व प्रकारची वाहतुक पुर्णवेळ पूर्णतः बंद करून उपलब्ध पर्यायी मार्गावर वाळवण्यास परवानगी मागितलेली आहे.
उपोद्घातातील वाचले कांक ४ आणि ५ अन्वये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग करुळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस करताना विना अडथळा होणेकरिता तळेरे-वैभववाडी-गगनबावडा-कळे-कोल्हापूर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक १५/०१/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत पुर्णवेळ वाहतुकीकरिता बंद करून सदरील मार्गावरील यहतूक उपरोक्त पर्यायी मार्गाने वळविणेसाठी अभिप्राय प्राप्त झालेले आहेत.
ज्याअर्थी जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग उपोद्धालातील अ.क्र.१ व २ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होणेकरिता तळेरे-वैभववाडी- गगनबावडा-कळे-कोल्हापूर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक २२/०१/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत पूर्णवेळ वाहतूकीकरिता बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ कलम ११६ नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करण्यात येईल.