काेल्हापूरः positivewatch
खरतर असा प्रयाेग आधीच अनेक दिवसापूर्वी व्हायला पाहिजे, हाेता. परंतु, देर आये दुरुस्त आले असेच म्हणालया हवे. सध्या काेल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न पूर्ण जिल्हातच नव्हे जिल्ह्याबाहेर देखिल गाजत आहे. अनेक लाेकांना, पर्यटकांना, भाविकांना काेल्हापूरात यायचे म्हटल की अंगावर काटा येताेय. काेल्हापूरला जाण्यापेक्षा थेट बेळगावला गेलेले बरं असंच अनेकजण म्हणत आहे. याचे कारण काय तर काेल्हापूर शहरातील खड्डेमय रस्ते, इतके माेठे खड्डे बघून, हे खड्डे आहेत. की खड्डेपूर असेच म्हणायची वेळ आली आहे. काेल्हापूर शहरात याविषयी आवाज उठविताना मात्र अनेकांनी दबकत दबकतच आवाज उठविला आहे, असेच म्हणालाय पाहिजे. पण आता गेल्या चार दिवसापासून काेल्हापूर शहरातील नागरिक, संस्था, व काही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते जागे झाल्याचे दिसून येत आहे. काहींनी तर चांगले रस्ते हाेत नाही, म्हणून खड्डे ंचे फाेटाे काढून फाेटाे सेशन केले. काहींनी सुरु असलेले काम बंद पाडले. काहींनी थेट नितीन गडकरी यांना सेल्फी व्हिडीओ करून सेड केला. व काेल्हापुरच शहराच्या वाट लागलेल्या रस्त्याची परिस्थिती सांगितली. इतकं करूनही, महापालिका प्रशासनाला जाग येत नाही, की सूस्त बांधकाम विभाग चांगले काम करण्याची तयारी दाखवित नाही, ही वस्तूस्तिती आहे. त्यातच आता आणखी एक आंदाेलन केल्याचे पुढे आले.
शिवसेना युवासेना युवती सेना कोल्हापूर यांच्या वतीने प्रशासनाचा निषेध करत, खड्डडयात दिवे लावून आंदोलन केले,. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था होऊन शेकडो लोकांचे अपघात होत आहेत, म्हणूनच कोल्हापूर चे खड्डेपूर करणाऱ्या निष्क्रिय प्रशासनाचा कोल्हापूर युवासेनेच्या वतीने खड्ड्यात रांगोळी काढून, पणती लावून यां झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा एक प्रयन्त करण्यात आला आहे. यावेळी पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य जी ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा करण्यात आल्या.. हे आंदोलन महाद्वार रोड नजीक करण्यात आले..यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर प्रमुख वैभव जाधव, शहर समन्व्यक आवदेश करंबे, उपशहर प्रमुख चैतन्य देशपांडे, रोहित वेढे, प्रथमेश देशिंगे, युवतीसेनेच्या माधुरी जाधव, तसेच सुरज कोळेकर,सतेज जगताप आदी उपस्थित होते..या आंदोलना साठी शिवसेना कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी, शहर पदाधिकारी तसेच युवासेना वरिष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. पाहुया आता यांच्या या अशा आंदाेलनातून तरी महापालिका प्रशासन, व बांधकामला विभागाला जाग येतेय का.. की प्रशासन व बांधकाम विभाग फक्त करमणूक म्हणून याकडे पाहणार. हे येणारी वेळच ठरवेल.
positive watch