भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी गुरुवारी (२७ ऑक्टोबर) मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की आता भारतीय महिला खेळाडूंची मॅच फी देखील पुरुष खेळाडूंच्या बरोबरीची असेल. यापूर्वी हा नियम न्यूझीलंडमध्ये लागू करण्यात आला आहे. नुकताच बीसीसीआयच्या एजीएममध्ये महिला आयपीएलचा पहिला सीझन २०२३ मध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे.
जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “BCCI महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटी (15 लाख रुपये), एकदिवसीय (6 लाख रुपये), टी-20 (3 लाख रुपये). समान वेतन ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी अॅपेक्स कौन्सिलचे आभार मानतो. जय हिंद.
2017 मध्ये आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघ पोहोचल्यानंतर महिला क्रिकेटमध्ये रस वाढला आहे. त्यानंतर संघ 2020 टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. या वर्षी ऑगस्टमध्ये या संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते