हुतात्मा नानकसिंग विद्यालयात डिजिटल लायब्ररी व ग्रंथप्रदर्शन उत्साहात
वारणावती – हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभव काका नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी, भव्य ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन तसेच ग्रंथालयाच्या डिजिटल लायब्ररी सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन माजी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांच्या हस्ते व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. ए. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनात जवळपास एक हजार पुस्तकांची मांडणी करण्यात आली. त्यामध्ये पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांचे जीवन चरित्र तसेच अनेक थोर समाजसुधारक व क्रांतिकारक यांचे ग्रंथ , स्पर्धा परीक्षा पुस्तके , विविध प्रकारच्या कथा कादंबरी व गोष्टीची पुस्तके इ. पुस्तकांचा समावेश होता. तसेच विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळेतील सर्व विज्ञान साहित्यांची मांडणी करण्यात आली होती.तसेच ग्रंथालय डिजिटल करण्यात आले त्याचे उद्घाटन ही करण्यात आले.आता एका क्लीकवर मुलाना हवे ते पुस्तक दिले जाणार आहे.
या प्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील पालक व शाळांनी घेतला. यावेळी ग्रंथालय प्रमुख एस. बी. अडिसरे व बी. ए. तडाखे , विज्ञान शिक्षक, व्ही. के. ठोंबरे , पी. बी. खिलारी , एस. जी. साठे , डी. एस. पवार , एस. एस. आंबी , प्रयोगशाळा सहाय्यक एस. एन. शेळके व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.