कुंभोज-विनाेद शिंगे
भारतातील सर्वोत्कृष्ट शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एज्युकेशन टुडे यांच्या कडून ‘डे कम बोर्डींग स्कूल’ श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेंगळुरू येथे झालेल्या ‘इंडिया स्कूल मेरिट अवॉर्ड’ सोहळ्यात विश्वस्त विनायक भोसले यांनी तो स्वीकारला. भारतातील शिक्षण क्षेत्रात स्कूल श्रेणीत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या संस्थांना हे पुरस्कार देण्यात येतात.
हा पुरस्कार एज्युकेशन टुडे चे कार्यकारी संचालक अनिल शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना विश्वस्त म्हणाले, की संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी या स्कूलची पायाभरणी उत्कृष्ट शिक्षण, उत्तम सोयी-सुविधा, नैतिक मूल्यांची जपणूक या विचारांनी केली आहे.
भारतातील सर्वोत्कृष्ट २० शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची राज्यातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकासाठी झालेली निवड हि अभिमानास्पद आहे. स्कूलला प्रगतीपथावर नेण्यासाठी सातत्याने कष्ट करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांचे खरंतर हे यश आहे. स्कूलच्या संचालिका, प्राचार्य सस्मिता मोहंती या सातत्यपूर्ण आणि समर्पण भावाने स्कूलसाठी कार्य करत असल्याने हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
घाेडावत विद्यापीठाची मुलं नि ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवला एक नवा अध्याय…वाचा सविस्तर
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ची सुरुवात 2010 मध्ये झाली. सध्या 4500 हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. पहिली ते दहावीपर्यंत सी.बी.एस.इ, आय. जी.सी.एस.इ आणि आय.बी. बोर्डस मध्ये डे बोर्डिंग आणि निवासी सुविधा ही स्कूल देते. पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथे विविध शालेय आणि सामाजिक उपक्रमाद्वारे या शाळांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत.
गाव स्वच्छ करणारा अवलिया.. पहा काेण आहेत हे ध्येयवेडे !
या पूर्वी स्कूलला एज्युकेशन वर्ल्ड यांच्याकडून देखील ‘डे कम बोर्डींग स्कूल’ श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.एज्युकेशन टुडे यांच्या कडून देण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी स्कूलच्या प्राचार्य सस्मिता मोहंतीआणि सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.