positivewatch
नमस्कार काेल्हापूर तालुका 🙏
गाव, जिल्हा व राज्य ठिकाण कोणतेही असो पण त्या भागाचा प्रत्येक गोष्टीत विकास होणे गरजेचे आहे.
सध्या या सर्व विकास कामात कोल्हापूर शहर,व हा जिल्हा मागे पडत आहे काय. असा मला पडलेला प्रश्न आहे?
तूम्हाला काय वाटतय एक जागरुक कोल्हापूरकर म्हणून?
आता तरी काेल्हापूर महापालिकेचा कारभार सुधारणार का, प्रशासक याची जबाबदारी घेणार,सुधारणा करणार की, जैसे थे !
रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज,शूरवीर व धडाडीचे नेतृत्त्व करवीर संस्थापिक महाराणी ताराराणी साहेब, सर्व सामन्य जनतेचे राजे अभ्यासु,कलेचे जाणकार,बहुगुण संपन्न लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज या सर्वांच्या पदस्पर्श लाभलेली अशी ही करवीर नगरी.याच नगरीला विचाराची नवी दिशा देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती महात्मा फुले, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे,संत रोहिदास महाराज तसेच सर्व संत महापूरूष व सामजिक चळवळ उभी करणारे थोर व्यक्ती अश्या सर्वांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आणि या वौचारिक महाराष्ट्रात सर्व गोष्टीत संपन्न असा हा करवीर रियासत म्हणजे “आपला कोल्हापूर जिल्हा” हे आपल शहर पण सध्या स्थानिक राजकारण, हेवेदावे, कुरापती, द्वेष,मत्सर यासारख्या अनेक गोष्टीमुळे हे शहर दिवसेंदिवस विकासाच्या बाबतीत मागे पडत आहे. त्यात आणखी भर म्हणजे भ्रष्टाचारी प्रशासन व चिरीमिरी खाणारे अधिकारी भरीस भर म्हणून आहेतच.या सर्वांच्या वरदहस्ता मुळे सोकाळणारे असे हे ठेकेदार व त्यांच्या कंपनी यानी तर डायरेक्ट सर्व सामान्य जनतेच्या भावनेशी खेळ मांडला आहे व प्रत्येक वर्षी जनतेच्या पैशाची चालू केलेली लुट.हे फक्त एक उदाहरण आहे.अशी आणखी किती उदाहरणं असतील ज्याच्या मुळे कोल्हापूर शहराचा विस्तार व विकास थांबला असेल.
- विचार करा कोल्हापूर कर?
याला जबाबदार कोण?
तुम्ही, आपण सर्व की स्थानिक नेते?
वर्षानुवर्षे सत्ता भोगणारे की कुरापतीचे राजकारण करणारे?
अकार्यक्षम नगरपालिका की भ्रष्टाचारी प्रशासन?
बैमान ठेकेदार की बैमान अधिकारी?
कोल्हापूर च्या जनतेला उत्तर हव आहे…!
आपलाच,
सर्व सामान्य कोल्हापूरकर
मारुती.अ.कसबे
बहुजन समाज पार्टी कोल्हापूर शहराध्यक्ष
मो.9021090555
ता. क. ः या आठवड्यातच काेल्हापूरमध्ये फुलेवाडी येथे काही नागरिकांनी काम बंद पडून रस्त्याच्या दर्जाबाबत आवाज उठविला हाेता. शाहुवाडी,पन्हाळा जवळही थेट एकाने केंद्रीय बांधकाम मंत्री यांना व्हिडीओ करून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विचारणा केली आहे. काेल्हापूर युवा सेनेच्यावतीने दाेन दिवसापूर्वी, रस्त्यावरच,खड्ड्यात दिवे लावून महापालिका कारभाराचा निषेध केलाय. जाेपर्यंत अशी चळवळ उभी राहणार नाही, ताेपर्यंत महापालिका प्रशासकीय कारभार सुधारणार नाही, बांधकाम विभागाला जाग येणार नाही, ठेकेदार आपल्याच मर्जीने वागणार. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पुढे येऊन, आपल्याच खिशातील पैसा घेऊन काम करणाऱ्या या शासकीय यंत्रणेला, अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. अन्यता, हे अधिकारी, ठेकेदार गल्लेलट्ठ, गर्भश्रीमंत हाेणार व आपण सारे दवाखान्यात, पाठ, माण दुरुस्तीसाठी लाखाे रुपये देणार, गाड्या दुरुस्तीसाठी मिस्त्रीला पैसा देणार.
एक पाँझिटीव्ह विचार. POSITIVVE WATCH चांगल्या कामासाठी चळवळीसाठी पाँझिटीव्ह वाँच नेहमीच आपल्या साेबत. सकारात्मक राहून,नव्या यशस्वी जीवनाकडे वाटचाल हीच पाँझिटीव्ह वाँचची भूमिका