कुंभोज – विनाेद शिंगे
ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर ग्रामविकास आघाडी कोरोची पॅनेलचा प्रचार शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब व भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या हस्ते ग्रामदैवत मारुती मंदिर, कोरोची येथून श्रीफळ वाढवून करण्यात आला.या प्रसंगी शशिकांत मोहिते, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार देवानंद कांबळे आणि दिपक तेली, आनंदी आमने, मीनाक्षी चव्हाण, ज्योती बाबर, आनंदा लोहार, अश्विनी चव्हाण, सोमनाथ मुसमुसे, विकी माने, वैजयंता चव्हाण, दिपाली सुतार, निलेश पाटील, संजय कांबळे, प्रियंका आवळे, माधवी कडगावे, शीतल पाटील, सुनिता मगदूम, मृणाल कुंभार आदी उमेदवार तसेच इचलकरंजी मतदारसंघातील भाजपचे विविध आघाडी मधील प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आवाडे गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.