कुंभोज-विनोद शिंगे
संजय घोडावत विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या सीएसआर विद्यार्थी क्लबने पाठक ट्रस्ट मिरज संचलित अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
अनाथ आश्रमातील मुलांना खेळणी ,शैक्षणिक साहित्य तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना कडधान्य, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी मुलांसोबत व ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ व्यतित केला व त्यांची विचारपूस केली. घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनात या भेटीचे नियोजन करण्यात आले. व्यवस्थापन विभागाच्या डीन डॉ. योगेश्वरी गिरी यांच्या नेटक्या नियोजनामुळे ही सदिच्छा भेट यशस्वी झाली. विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सी.एस.आर क्लब चे समन्वयक प्रा.अनिरुद्ध कांबळे आणि प्रा.योगिनी कुलकर्णी यांच्यासोबत एम.बी.ए,बी.बी.ए आणि बी.कॉम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.सुमेध हर्षवर्धन, मैथिली कोपर्डे,मिताली रावराणे, आदर्श त्रिपाठी, मानसी मिरजकर, साक्षी आठमुठे या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यासाठी परिश्रम घेतले.