*इंडोकाऊंट मिल कामगारांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीने यश मिळाले -सतिश माळगे.*
हातकणंगले :(रुपेश आठवले)
*गेली १२ ते १३ दिवस सुरू असलेल्या २०० ते २५० कांमगारांना परमनंट करा या मागणीसाठी इंडोकाऊंट मिल कामगारांचे आंदोलन कंपनी च्या दारात तसेच पोलीस स्टेशन हातकणंगले आणि हातकणंगले तहसीलदार यांचे दारात सुरु होते. हे आंदोलन सुरू असताना अनेकवेळा कंपनी प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचे काम सुरू होते तसेच राजकीय दबावतंत्र सुरू होता.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली.या आंदोलनास पाठिंबा देत कंपनी प्रशासन यांच्याशी चर्चा करत संबंधित कंपनी मिल कांमगारांच्या मागण्या पुर्ण करा अन्यथा, हे आंदोलन अति तीव्र करण्याचा इशारा यावेळी बैठकी दरम्यान देताच.कंपनी मिल प्रशासनाने चर्चेस पुर्ण विराम देत.संबंधित मिल कामगारांना एक वर्षाच्या आत आम्ही २०० ते २५० कांमगारांना परमंनंट करू असे लेखी पत्र देत मिलकांमगारांच्या मागण्या मान्य केल्या.
या आंदोलनास पंचायत समीती उपसभापती प्रवीण पाटील,आळते ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर,रिपब्लिकन सेने चे शिरीष थोरात,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतिश (दादा) माळगे यांनी कंपनी प्रशासनाशी योग्य चर्चा करत मिल कांमगारांना योग्य न्याय मिळवून दिला.*
VIDEO बघा
*या आंदोलनास स्थानिक पंचक्रोशीतील कार्यकर्ते सागर खोत,दिपक शिंदे,शशिकांत घाटगे,संदीप बाचणकर,नेमीनाथ वसगडे,शंकर गावडे,सचिन बिरंजे,शब्बीर मुजावर,प्रतीक तोरकर,काशीनाथ भिसे तसेच सर्व मिलकांमगार यांनी योग्य भूमीका घेतलेने या आंदोलनास यश मिळाले म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतिने रामदास आठवले तसेच कोल्हापूर जिल्हा सचिव सतिश माळगे यांनी कंपनी प्रशासनाचे आभार तसेच मिल कामगारांचे अभिनंदन केले आहे.