VIDEO पहा – असं तुमच्या शहरात घडेल का? ठाणेकरांनी करून दाखवलं…तुम्ही ही अधिकरवाणीने ही माहिती घ्या…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

संकेत कळके

असं सर्व शहरात व्हायला पाहिजे! पोलिसांच्या टोईंग गाडी व कर्मचाऱ्यांचा ठाणेकरांनी केला पंचनामा, पोलीस हतबल…

POSITIVVE WATCH: कायदा व नियम सर्वाना सारखेच!माहिती जाणून घेण्याचा अधिकार सर्वानाच…

ठाणे – ठाणेतील घटना…एक पोलीस टोईंग व्हॅन वाहन उचलण्याचे काम करत होती. नेमकं याच वेळी येथील जागरूक नागरिक आले. त्यांनी हा प्रकार पाहिला, यामध्ये, एक सुज्ञ व जागरूक नागरिक चेतन चिटणीस उपस्थित होते. त्यांनी पोलीस हवालदार यांच्यासह टोइंग मधील कर्मचाऱ्यांना जाब विचारत त्यांच्याकडेच अधिकृत कागदपत्र आहेत का याची चौकशी केली असता. उपस्थित सर्व नागरिक व वाहन चालकांना धक्का बसला जे कायद्याचे काम करतात तेच बेकायदेशीर असल्याचे समोर आले कोणत्याही टोईंग व्हॅन मधील कर्मचाऱ्याकडे अधिकृत कागदपत्र नव्हती टोइंग व्हॅन चालवणारा देखील विना लायसन असल्याचे दिसून आले जे वाहन उचलतात त्यांच्याकडेही अधिकृत पेपर नव्हते.

चेतन चिटणीस या व्यक्तिमत्त्वाने हे करून दाखवलं आणि बेकायदेशीर कर्तव्य बजावत असल्याचे देखील सिद्ध करून दाखवलं प्रत्येक शहरात चेतनचिटणीस तुम्ही आम्ही बनू शकतो पोलिसांच्या विरोधात नव्हे पण पोलीस देखील कायद्याने व नियमात वागतात की नाही याची माहिती जनतेला समजणे गरजेचे आहे हेच या घटनेतून सिद्ध होत आहे. चेतन चिटणीस यांनी उपस्थित पोलीस हवालदार व कर्मचाऱ्यांना जी काही विचारणा केली तेव्हा मात्र सारेच निशब्द झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पोलीस यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यामध्ये जेव्हा करार होतो तेव्हा, ठेकेदाराला अनेक नियम व अटी शर्तींचे पालन करावे लागते मात्र, याकडे अनेक शहरांमध्ये सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. टोइंग व्हॅन मधील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असणे, गाडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, तसेच अनाउन्सिंगसाठी मोठा स्पीकर असणे गरजेचे असते मात्र, या सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास पाहायला मिळते ही वस्तुस्थिती आहे. वाहन चालकांना आपली गाडी का उचलली हे माहिती घेण्याचा अधिकार आहे, मात्र तो देखील वाहन उचलताना पूर्ण केला जात नाही. थेट कार्यालयात येऊनच भेटा. गाडी घ्या. असे सांगितले जाते. अशावेळी अनेकदा वाहनचालक टोइंगवालेच्या मागे थांबा थांबा म्हणून धावत जातात. मात्र पोलीस किंवा कर्मचारी पुढे निघून जातात. साधे समजावून सांगण्याची तसदी देखील घेत नाही. अस बऱ्याचदा पहायला मिळते.

खरंतर वाहन उचलणारे पोलीस सक्षम हवेत व त्यांच्याकडे देखील अधिकृत कागदपत्र असायलाच हवेत ज्या वाहनातून गाड्या उचलल्या जातात त्या गाड्यांचीच अधिकृत कागदपत्र नसल्याचे अनेकदा अनेक शहरातून चौकशी अंतिम समोर आले आहे त्यामुळे पोलीस यंत्रणाच जर स्वतःकडे अधिकृत कागदपत्र बाळगत नसेल तर वाहन चालकांना विचारण्यात आजचा त्यांना अधिकार आहे का असाच सवाल सर्वसामान्य वाहन चालकांच्या मध्ये निर्माण होत आहे ही घटना पोलीस यंत्रणेला नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.