विद्या मंदिर मजरे कासारवाडा येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्साहात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विद्यार्थ्यांना भेटवस्तू स्वरूपात वह्या, पाट्यपुस्तके व गणवेश वाटप

राधानगरी (विनायक जितकर) – विद्या मंदिर, मजरे कासारवाडा ता. राधानगरी या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वागताची भेटवस्तू स्वरूपात वह्या, पाट्यपुस्तके व गणवेश वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी एकत्र येऊन स्वागत गीताने सुरुवात झाली.

पालकांनी आपल्या मुलांचा हात धरून शाळेत प्रवेश केला, ज्यामुळे वातावरण अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण जपण्याचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली, ज्यामुळे लहान वयातच पर्यावरणपूरक सवयींचा प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड मा के नाम” या योजनेअंतर्गत प्रत्येक मातेला एक रोप देण्यात आले आणि त्याचे संगोपन करण्याचे व्रत पालकांनी घेतले. शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि तो असाच आनंदात साजरा झाला तर शिक्षणाची गोडी अधिक वाढते, असे मत यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी मुख्याध्यापक सुनील कुदळे यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हणाले, “शाळा हा केवळ शिक्षणाचा केंद्रबिंदू नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पहिलीचा दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण असतो. आज आपल्या शाळेत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे स्वागत करताना आम्हालाही खूप आनंद होत आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि नैतिक विकासासाठी कटिबद्ध आहोत. पालकांनीही शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, हीच विनंती.”

कार्यक्रमास बिद्रीचे माजी संचालक युवराज वारके, सचिन वारके, अरुण वारके, सुहास वारके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन तौंदकर, उपाध्यक्ष महेश वारके, शाळेचे मुख्याध्यापक सुनील कुदळे, शिक्षकवृंद साताप्पा शेरवाडे, रुपाली कुदळे, मेघा फराकटे, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी युवराज वारके, साताप्पा शेरवाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.