राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या समृतिदिन निमित्त शिवशक्ती प्रतिष्ठांनच्या वतीने विनम्र अभिवादन
कोल्हापूर – आज शनिवार दि. ६ मे २०२३ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुरातील राजारामपुरी, शाहूनगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले.
सकाळी ८ वाजता शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारक परिसरामधील मूर्तीची पाण्याने स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्मारकाभोवती फुलांची सजावट करून झाल्यानंतर सर्वांनी ५ मिनिटे स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव, प्रशांत जाधव, संदीप पाडळकर, प्रफुल्ल भालेकर, विश्वास गंगाधर, प्रवीण कुरणे, मनीष बडदारे, श्रेयस कुरणे आदि सदस्य उपस्थित होते.