पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
निपाणी -(अवधूत काेरडे)ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निपाणीकरांसाठी खास “लाठी… द गर्ल्स पॉवर” या लघुपटाचा स्पेशल प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. बुधवार ३ आणि गुरुवार ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता व रात्री ९ वाजता, श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स येथे हा शो होणार आहे. मुलींच्या आत्मसंरक्षणाचा संदेश देणारा हा चित्रपट सर्वांनी अवश्य पाहावा, असे आवाहन निर्माते-दिग्दर्शक अभिजीत सोकांडे यांनी केले आहे.
“लाठी हा फक्त एक चित्रपट नाही, तर समाजातील प्रत्येक मुलगी आणि महिलेला आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरणा देणारा संदेश आहे. आजच्या तरुण पिढीने स्वतःमध्ये ताकद शोधली पाहिजे, ‘मी काहीही करू शकते’ हा विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा लघुपट पाहून प्रत्येकाला नक्कीच एक नवी ऊर्जा मिळेल, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे निपाणीकरांनी गणेशोत्सवात सजावट-देखावे पाहतानाच हा सिनेमा कुटुंबासह जरूर अनुभवावा, ही माझी नम्र विनंती आहे.” –
**– अभिजीत सोकांडे (लेखक-दिग्दर्शक व निर्माते)
गणेशोत्सवाच्या आनंदसोहळ्यात निपाणीकरांसाठी हशा, ॲक्शन आणि प्रेरणा यांचा संगम घेऊन येत आहे लघुपट – “लाठी… द गर्ल्स पॉवर”. हा चित्रपट बुधवार ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स (निपाणी नगरपालिकेजवळ) येथे रसिक प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे.
फुल कॉमेडी + ॲक्शन + मोटिवेशन + इन्स्पिरेशन मुली व महिलांनी आत्मरक्षणासाठी सक्षम व्हावे, आत्मविश्वास वाढवावा आणि “गर्ल्स पॉवर” जगासमोर यावे, हा या चित्रपटाचा मुख्य संदेश आहे. विशेषतः युवा पिढीला मार्गदर्शक ठरणारा हा लघुपट नक्कीच पाहण्याजोगा आहे.
शोचे वेळापत्रक बुधवार ३ आणि गुरुवार ४ सप्टेंबर संध्या. ६.३० वा. व रात्री ९ वा. श्री संत बाबा महाराज कॉम्प्लेक्स, निपाणी
फक्त २५ रुपये पास शुल्क लकी ड्रॉ मधून आकर्षक बक्षिसे
गणेशोत्सवात मंडळांच्या मूर्ती सजावट व देखावे पाहण्यासाठी आलेल्या रसिकांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे.पुढच्या महिन्यात कोल्हापूरमध्ये या फिल्मचा आणखीन एक प्रीमियर शो असेल.
हा लघुपट सर्वांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक व निर्माते अभिजीत सोकांडे यांनी केले आहे.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.