प्रवासातही जपली भक्तीची परंपरा… “कार्तिक” चा असाही उपक्रम, ट्रँव्हल्समध्ये बसले गणपतीबाप्पा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये बाप्पाचं आगमन – 

कोल्हापूर : {रुपेश आठवले}
घरापासून लांब, रात्रंदिवस प्रवाशांना सुखरूप पोहोचवणाऱ्या चालक–वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्तिक ट्रॅव्हल्सने गेली तीन वर्षे एक आगळीवेगळी परंपरा सुरू केली आहे. प्रवासातच गणपती बाप्पाचं आगमन करून आरती-पूजा करण्याची ही खास पद्धत आता त्यांची सांस्कृतिक ओळख ठरली आहे.

दरवर्षी प्रवाशांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती घालून कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये गणेशोत्सव साजरा होतो. यंदाही मालक अशोक कुचकोरवी यांच्या उपस्थितीत चालक–वाहकांनी बाप्पाचे स्वागत करून मनोभावे आरती केली. प्रवाशांनाही या क्षणांचा अनोखा अनुभव मिळाला.

मालक अशोक कुचकोरवी म्हणाले :
“आमच्या गाड्या रात्रंदिवस धावत असतात. चालक, कर्मचारी घरापासून दूर असतात. म्हणून आम्ही ठरवलं – प्रवासातही घरासारखं वातावरण मिळालं पाहिजे. बाप्पा आला की कर्मचाऱ्यांना घराची उब मिळते, प्रवाशांनाही आपलेपणाचा अनुभव येतो. हीच आमची खरी परंपरा आहे.”

KARTIK : कार्तिक ट्रॅव्हल्सची नवी झेप – आता हैद्राबाद बस प्रवाशांच्या सेवेत

चालकांची भावना :
“सणाला आम्ही घरी नसतो, पण इथे बाप्पा बसतो तेव्हा वाटतं – आपण घरापासून दूर नाही. प्रवास करताना आरती करणं म्हणजे वेगळंच समाधान मिळतं,” असं चालक मंडळी सांगतात.

फक्त गणेशोत्सवच नव्हे तर महिला दिन, गुडीपाडवा, दसरा, दिवाळी असे अनेक सण-उत्सवही कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये साजरे होतात. प्रवासातही उत्सवाची उब, भक्तीचा रंग आणि संस्कृतीचं तेज अनुभवायला मिळतं.

कार्तिक ट्रॅव्हल्सचा हा उपक्रम केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक व सांस्कृतिक बंध जपणारा आहे. प्रवासात घरगुती आनंद अनुभवणं हीच खरी संस्कृतीची जपणूक ठरते. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत असून, माणसं कुठही असली. तरी आपला सण, उत्सव आहे, त्या ठिकाणी साजरा करतात हे मात्र निश्चिचत. 

…नर्मदा-कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये अस काय घडलं की, सोशल मीडियावर व्हायरल होतंय! वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.