पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 |
|

काेल्हापूरः शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांना किमान वेतन मिळावे यासाठी गेल्या पाच दिवसांपासुन बेमुदत उपोषण सुरु होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलकांनी महापालिकेसमोर महाघंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.दरम्यान प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याशी आप व सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. शहरातील कचरा प्रश्नी वसंतराव मुळीक, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, बाबासाहेब भोसले यांनी भूमिका मांडली. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
यांनतर प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, लेखापरीक्षक मिसाळ, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासोबत याप्रश्नी बैठक झाली. शहराचे आरोग्य लक्षात घेता प्रशासकांनी विशेषधिकार वापरून टिप्पर चालकांना किमान वेतन प्रमाणे लाभ देण्यासाठी निर्णय घेत ,पुढील आठ दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच मागील टेंडर प्रक्रियेच्या वर्क ऑर्डर प्रकरणी दोन दिवसात निर्णय घेण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. पुढील एका महिन्यात टेंडर मधील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर देण्याचे स्पष्ट आदेश प्रशासकांनी दिले.
सायंकाळी सहाच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व आप पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन किमान वेतन प्रमाणे कार्यवाही करत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली.गेले पाच दिवस बेमुदत उपोषण सुरु होते. हा लढा टिप्पर चालकांच्या एकजुटीने यशस्वी झाल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.

यावेळी सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, उत्तम पाटील, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, राकेश गायकवाड, संजय राऊत, रणजित बुचडे, संजय नलवडे, आदम शेख, अमरसिंह दळवी आदी उपस्थित होते.
|
 |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 447