महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांची २४७ वी जयंती उत्साहात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गगनबावडा: गगनबावडा तालुका मल्हार सेनेच्या वतीने आज गगनबावडा येथे महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमात बोलताना गोकुळचे संचालक तथा मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके म्हणाले महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांचे कार्य तरुण पिढी साठी प्रेरणादायी आहे.महाराज यशवंतराव होळकर यांचा जन्म १७७६ आणि मृत्यू १८११ या अवघ्या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या बरोबर अठरा वेळा लढाई केल्या आणि सर्व लढाया जिंकल्या.

आजच सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हा!

खरंतर भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून यशवंतराव होळकर यांना ओळखत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारा हिंदुस्तानातील एकमेव राजा यशवंतराव होळकर हे होते.खरंतर इतिहासकारांनी यशवंतरावांना जातीय बंधनात अडकून त्यांच्या कर्तुत्वाला आतापर्यंत ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे, तो मिळाला नाही आणि म्हणून मल्हार सेनेच्या वतीने यशवंतरावांचा इतिहास खरा इतिहास हा जगासमोर आणण्यासाठी अनेक पुस्तकांचे लेखन सध्या सुरू आहे. आणि ते या नजीकच्या काळामध्ये सर्व समाजासमोर आणले जाईल आणि यशवंतरावांच्या इतिहासाला यशवंतराव यांच्या कर्तुत्वाला न्याय देण्याची भूमिका ही मल्हार सेनेचे राहिली,यशवंतराव होळकर यांनी संपूर्ण देशभर केलेले कार्य आजच्या तरुण पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. त्यांचा विचार घेऊन या पुढच्या काळामध्ये मल्हार सेना कार्य करत राहील.अशी प्रार्थना आजच्या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त केली .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कोदेचे माजी सरपंच सहदेव कांबळे हे होते . यावेळी सुरेश वरेकर,नागेश गावडे, पांडुरंग शेळके, भागोजी बरगे, विठ्ठल आडुळकर, भागोजी कोकरे, नागोजी बरगे, सुहास डफडे, दीपक गावडे, बबन हुंबे, जयेश कोळेकर, सुनील आडुळकर शांताराम बरगे, आनंदा अडुळकर, संतोष आडूळकर,सुरेश डफडे, यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराज यशवंतराव होळकर जयंती निम्मित फोटो पुजन करताना डॉ . डी . वाय पाटील कारखान्याचे संचालक सहदेव कांबळे , गोकुळचे संचालक बयाजी शेळके ,नागेश गावडे, सुहास डफडे , सुरेश डफडे , इतर मान्यवर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.