पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 |
| मुंबई – जीवनाधार फाऊण्डेशनने सामाजिक क्षेत्रात फारच महत्वपूर्ण काम केले असून मुंबै महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईचा नावलौकिक वाढवणार्या व्यक्तींचा सन्मान करुन त्या निमित्ताने समाजाचे ऋण व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न फारच गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन खा. अरविंद सावंत यांनी केले.
३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत जीवनाधार फाऊण्डेशनच्या वतीने होणार्या ७ व्या ‘मुंबै महोत्सवा’च्या वेबसाईटचे अनावरण खा. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे, सचिव अनिता खाडे, रंगकर्मी व मुंबै महोत्सवाचे क्रिएटीव्ह हेड श्रीनिवास नार्वेकर, नाट्यनिर्मात्या व समाजमाध्यम समन्वयक सुप्रिया चव्हाण, हेमंत वीर उपस्थित होते.
वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या १९ व्यक्तींना ‘मुंबै गौरव सन्मान’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, तर मुंबै भूषण, मुलखावेगळी माणसं, संस्थात्मक पातळीवर महत्वपूर्ण कार्य करणार्या संस्थेस सामाजिक कृतज्ञता सन्मान आणि ‘जीवनाधार जीवनगौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात येणार आहे. ‘मुंबै महोत्सवा’चे वेगळेपण जपण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. यावेळी त्यामध्ये अधिक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, असे अध्यक्ष राजेश खाडे म्हणाले. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
या वर्षी २ ते ४ जानेवारी या कालावधीत होणार्या पुरस्कार वितरण कार्यक्रमांव्यतिरिक्त ‘मुंबै सायक्लोथॉन’ ही पर्यावरणपूरक सायकल रॅली होणार आहे. ‘आगळावेगळा जोडी विशेष मराठमोळा पारंपरिक फॅशन शो’ हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. ४१ वाद्ये आणि ४२ कलाकारांचा सामावेश असलेला ‘नाद’ हा फ्युजन बॅण्ड, लावणी कलाप्रकारातल्या बदलत्या भाषेचा आढावा घेणारा ‘ये लावणीचे बोल कौतुके’ आणि मराठमोळा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा यामध्ये सामावेश आहे.
‘मुंबै महोत्सवा’मध्ये होणार्या सायक्लोथॉन व फॅशन शोबद्दल अधिक माहिती www.mumbaimahotsav.com या वेबसाईटवर मिळेल, असे आयोजकांनी म्हटले आहे. |
| VIDEO पाहण्यासाठी निळी लिंक करा. https://youtu.be/fH-h5AfQYnY

|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 261