“मृतदेह वाहतो नदीतून… राजकारण वाहतं आश्वासनांतून!”
(मिलिंद चव्हाण) | कडवई
संगमेश्वर तालुक्यातील कडवई-तुरळ परिसरातील वाणीवाडी बाजारपेठ व समर्थनगर भागातील ग्रामस्थांसाठी मृत्यू ही केवळ एक नैसर्गिक घटना नसून, एक संघर्ष बनली आहे. या गावांमध्ये अंत्यविधी करणे म्हणजे मृत्यूशी दुसऱ्यांदा झुंज देणे! कारण, गेली सात दशके परंपरेने वापरली जाणारी स्मशानभूमी नदीपलीकडे असली, तरी तेथे जाण्यासाठी आजही रस्त्याचा मागमूस नाही!
पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहते. अशा वेळी ग्रामस्थांना मृतदेह मानवी साखळी करून नदी पार नेण्याची वेळ येते. जीव धोक्यात घालून शेवटचा संस्कार करताना, कित्येकदा हे धाडस अंगावर येते. काही प्रसंगी मृतदेह वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत गावातील तरुणांची तत्परता आणि धैर्य अनर्थ टाळते.
स्मशानभूमीचा वाद मिटला, पण विकासाचे पाय अजूनही थांबलेलेच!
या भागात स्मशानभूमीच्या जागेवरचा वाद काही काळापूर्वी सामोपचाराने सुटलेला असतानाही, अजूनही रस्त्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही. निवडणुकांच्या वेळी रस्त्यांचे, पुलांचे आश्वासने ठरलेली गाजरं दाखवली जातात, पण प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांत एक वीटही त्या ठिकाणी बसवलेली नाही, ही संतापजनक स्थिती आहे.
मृत्यूचाही प्रवास जीवघेणा! संगमेश्वरच्या ग्रामस्थांची वेदना प्रशासनाच्या कानावर कधी पडणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई-तुरळ परिसरातील वाणीवाडी बाजारपेठ व समर्थनगर भागातील ग्रामस्थांना अंत्यविधी सुद्धा लढाईप्रमाणे करावा लागतोय.
गेल्या ७० वर्षांपासून नदीपलीकडे असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना पूल — केवळ जीवनाला धोका पत्करून, मानवी साखळी करून नदी पार.
पावसाळ्यात हा प्रवास अधिकच भयाण. कित्येक प्रसंगी मृतदेहासोबत जिवंत माणसेही वाहून गेली असती, तरी गावातील तरुणांच्या धाडसाने अनर्थ टळले.
ग्रामस्थ संतप्त आहेत — स्मशानभूमीचा वाद संपला, पण विकासाची सुरूवात अजूनही झालेली नाही. लोकप्रतिनिधींची आश्वासने केवळ निवडणुकापुरती.
“आता संयमाचा अंत झालाय. प्रशासनाने तातडीने रस्ता आणि पूल बांधकामाची सुरुवात केली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू!” असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
️ : मृत्यूही तडजोडीने…
मृत्यूच्या शेवटी अशी शोकांतिक,
नशिबाने मांडली थट्टा फारिक.
नदीपलीकडे अंत्यसंस्कार करायचा,
पण रस्ताच नाही, हा न्याय कोणाचा?“शेवटचा प्रवास सुद्धा इतका अवघड का?”
गावकरी विचारतात – जिथे माणूस जगतो त्या आयुष्यात दु:खं, अडचणी समजू शकतात; पण माणसाचा शेवटचा प्रवासही इतका यातनामय का असावा? स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्यानं केवळ अंत्यसंस्कार नाही, तर माणसाच्या अस्मितेलाही प्रश्न निर्माण होतो आहे.
व्हीडीओ पहा.. बातमीच्या बाजूला दिसेल.. क्लिक करा. आंदोलनाचा इशारा: संयमाचा बांध तुटू लागला आहे, ,”शेवटच्या प्रवासातही संघर्ष… कशासाठी जगतो आपण?”
ग्रामस्थ आता थेट इशारा देत आहेत – “आमचा संयम संपत चालला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जर तातडीने पूल आणि रस्त्याच्या कामासाठी ठोस पावलं उचलली नाहीत, तर आम्हाला नाईलाजाने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावं लागेल.”
एक मागणी – एक हक्क—-“अंत्यविधी की मृत्यूची दुसरी वेळ?” हा केवळ रस्त्याचा प्रश्न नाही, हा माणुसकीचा प्रश्न आहे. मृत्यूवर मात करून अंत्यसंस्कार करणारे हे ग्रामस्थ विकासाच्या मुख्य प्रवाहात केव्हा येणार? आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं, हीच त्या गावकऱ्यांची विनंती नाही, तर आर्त हाक आहे.
मरणासाठी रस्ता मागतो आम्ही, हक्काचा हक्क दे रे दादाजी! शेवटच्या प्रवासात अडवू नको, मानवीयतेला थोडं तरी जपू नको? |
नेते येतात, आश्वासनं देतात, निवडून जातात, पण शब्द विसरतात. एक वीटही न बसलेली जागी, गाव रडतो, नदी हासते मागे. |
मृत्यूच्या शेवटी अशी शोकांतिक, नशिबाने मांडली थट्टा फारिक. नदीपलीकडे अंत्यसंस्कार करायचा, पण रस्ताच नाही, हा न्याय कोणाचा? |