शिरोली पु. येथे पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीभावाने निरोप… गणपती बाप्पा मोरया!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिरोली पु. (ता. हातकणंगले- रुपेश आठवले)

गावामध्ये पाच दिवस विराजमान राहून भक्तांच्या घरोघरी आनंद आणि उत्साह फुलवणाऱ्या गणरायाला आज अखेरचा निरोप देण्यात आला. गाव तलावात विसर्जनाची मंगल प्रक्रिया पार पडली.विसर्जन मिरवणुकीत तरुण मंडळांनी आपल्या गणू बाप्पाच्या मूर्ती सजवण्यात कसलीही कसर ठेवली नव्हती. ढोल-ताशे, लेझीम, डीजे, लाईट्स आणि लेझर शोने गावभर वातावरण दुमदुमले. गुलाल व फटाक्यांनी रंगलेल्या या शोभायात्रेत “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी आसमंत गाजला. भक्तांच्या हृदयातून ओसंडून वाहणारा आनंद, ओलावलेली नजर आणि बाप्पाला निरोप देण्याची वेदना – या सगळ्यांनी वातावरण भावपूर्ण झाले.

शिरोलीत पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप – Positive Vach Media रिपोर्ट- रुपेश आठवले.

गणेश मित्र मंडळाची माधुरी हत्तीची प्रतिकृती यावेळी मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरली. गावातील अनेक मंडळांनी केलेली सुबक मूर्ती सजावट लोकांना थक्क करून सोडणारी होती. विसर्जनासाठी गाव तलावावर ग्रामपंचायतीतर्फे उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्व मंडळांनी भक्तिभावाने आरती करून, पुजा करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

पाच दिवस घराघरात विठला-पंढरीसारखा गजर करणाऱ्या गणपती बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताचे मन भरून आले. प्रत्येकाच्या मुखातून एकच आर्त स्वर उमटत होता –
“गणपती बाप्पा मोरया! पुढल्या वर्षी लवकर या!”

गणेश मित्र मंडळाने साकारलेली माधुरी हत्तीची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरली. विसर्जन मिरवणुकीनंतर गाव तलावावर आरती व पूजा करून भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी आकर्षक व्यवस्था केली होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण डोळ्यांत अश्रू होते—लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे मन भरून आले होते.

✍️ रिपोर्ट : रुपेश आठवले | Positive Watch, शिरोली (पु.)

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.