पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर : ऊर्जा सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने ‘सौरछत हे सुरक्षाछत’ आहे. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर, सांगली जिल्ह्याने सौरछताव्दारे वीज निर्मिती क्षमतेचा 100 मेगावॅटचा टप्पा ओलांडत आघाडी घेतली आहे. या ‘शतकी’ कामगिरीत 6 हजार 626 सौरग्राहकांचा सहभाग आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 308 ग्राहकांनी 65.79 मेगावॅट क्षमतेची व सांगलीतील 2 हजार 318 ग्राहकांनी 34.27 मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा वीज निर्मितीसाठी आपल्या छतावर बसविली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची सरासरी विजेची मामहावितरणगणी 927 मेगावॅट इतकी आहे. ग्राहकांकडून ‘सौर’चा हा 100 मेगावॅटचा टप्पा आशादायक वाटचाल आहे.
केंद्रशासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाव्दारे घरगुती ग्राहकांना (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) सौरछत / ‘रूफ टॉप सोलर’ बसविण्यासाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेची महावितरणकडून अंमलबजावणी सुरू आहे. तरी वीजग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे. अधिक माहिती व अर्जाची सुविधा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील http://www.mahadiscom.in/ismart या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 57 व सांगलीतील 452 घरगुती ग्राहकांनी अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौर यंत्रणा बसविली आहे. उर्वरीत ग्राहकांनी विनाअनुदानित तत्वावर सौर यंत्रणा बसविली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती 1914, वाणिज्यिक्य 802, औद्योगिक 323 व इतर 212 तर सांगली जिल्ह्यात घरगुती 990 ,वाणिज्यिक्य 405,औद्योगिक 158 व इतर 313 ग्राहकांनी विनाअनुदानित तत्वावर सौर यंत्रणा बसविली आहे.
1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी साधारणपणे 108 स्क्वेअर फूट, जिथे सावली पडत नाही, अशी जागा आवश्यक आहे. त्याव्दारे वार्षिक सरासरीनुसार प्रत्येक महिन्याला 120 युनिट वीज निर्मिती होते. मासिक वीज बिलात बचत होऊन गुंतविलेल्या रक्कमेची 4 ते 5 वर्षात परतफेड मिळते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरुस्तीमुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आर्युमान वाढते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.