पाऊस काेसळणार… राज्यात धरणार जाेर, गणेशाेत्सव यंदाचा पावसातच!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राज्यात पुन्हा पावसाचा जोर : गणेशोत्सवावर सावट

रंजित आवळे | चिपळूण- टीम पाँझिटीव्ह वाँच

गणेशोत्सवाच्या आनंदावर आकाशातून पुन्हा सरींचा शिडकावा होणार आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, कोकण ते विदर्भ अशा अनेक भागांत मुसळधार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. समुद्र उधाणलेला राहू शकतो, त्यामुळे मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा-महाबळेश्वर परिसर, नंदुरबार-धुळे-जळगाव जिल्हे तसेच मराठवाड्यातील हिंगोली-नांदेड येथेही पावसाच्या सरींसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही मेघगर्जना व सरींचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व भागांत हवामान खात्याने पिवळा इशारा (Yellow Alert) जारी केला आहे.

दरम्यान, राज्याच्या इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी अनेक ठिकाणी दिवसभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. गेल्या २४ तासांत सोलापूरने राज्यातील उच्चांकी ३१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रातील दमट वाऱ्यांमुळे ढगांची दाटी वाढली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.