अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. विविध प्रादेशिक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या सीबीआय आणि ईडीच्या छाप्यांमुळे अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरण्याची शक्यता आहे. दुसर्या टप्प्यात दोन्ही सभागृहांच्या 17 बैठका होणार असून, यात 35 विधेयके पारित केली जाणार आहेत. यातील 26 विधेयके राज्यसभेत तर, 9 विधेयके लोकसभेत प्रलंबित आहेत. 6 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला होता. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सभागृहांत झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले होते. या नंतर आता दुसऱ्या टप्यातील अर्थसंकल्प सादर होईल. |