नाशिक (विलास गायकवाड) : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात झालेल्या १७ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद सिंधुदुर्गला मिळाले तर तृतीय क्रमांक सोलापूर आणि चतुर्थ क्रमांक सातारा जिल्ह्याने पटकावला.
३२ संघांचा उत्साही सहभाग
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत राज्यातील तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतला. साखळी पद्धतीतून रंगलेल्या लढतीनंतर सेमी फायनलमध्ये सिंधुदुर्ग, ठाणे, सोलापूर आणि सातारा पोहोचले. अंतिम फेरीत ठाण्याने सिंधुदुर्गचा पराभव करून अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग
या सोहळ्याला भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव सौ. मीनाक्षी गिरी, युवा नेते मा. सयाजीराजे मोहिते पाटील, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, सहसचिव चंद्रकांत तोरणे, महिला अध्यक्षा धनश्री गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
राष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल
अखेरच्या फेरीत चमक दाखवलेल्या महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईचे संघ आता आगामी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत (मथुरा) सहभाग घेणार आहेत.
Positive Vach व Youth Associationच्या वतीने या सर्व विजेत्या संघांचे मनःपूर्वक अभिनंदन. क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या या खेळाडूंमुळे महाराष्ट्राचे नाव उंचावत आहे.
![]() |
![]() |
![]() |