भयानक : आव्हान तपासाचे..! तरुण रक्ताच्या थारोळ्यात… खून का घडला?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मृतदेह गाडीतच सोडून मारेकरी फरार; गुन्हेगारांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान…

कुरुंदवाड प्रतिनिधी – शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी – भैरववाडी रस्त्यावर गॅस एजन्सी जवळ असणाऱ्या सागर कोप्पे यांच्या शेताजवळ एका चार चाकी गाडीत ३५ वर्षीय युवकाच्या शरीरावर,पोटावर धारधार शस्त्राने वर्मी घाव करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाणे चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान चारचाकी गाडी सांगली येथील असून युवकाचा खून करून त्याचा मृतदेह गाड़ीतच ठेवून मारेकरी पसार झाले आहेत. खून कोणी आणि का केला? याचा तपास कुरूंदवाड पोलीस करीत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरच्या चार चाकी गाडी थांबलेली होती त्यामध्ये अंदाजे ३५ वर्ष वयाच्या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेह गाडीतच ठेवला होता. गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला होता.

मृतदेह चार चाकी गाडीतच सोडून मारेकरी फरार झाले असून पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या मार्गावर खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.