डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए जी-एन मध्ये निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एआयएमएल विभागाचा गौरव वाढला

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एआयएमएल विभागाच्या 2024-25 बॅचमधील विद्यार्थी स्वप्नील अलंगे यांची भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लिकेशन्स ॲन्ड जिओ इन्फॉर्मेटिक्स येथे एआयएमएल इंजिनियर पदावर निवड झाली आहे. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत आहे.

स्वप्नील यांच्या या उल्लेखनीय यशामुळे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एआयएमएल विभागाचा गौरव वाढला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.