Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
 |
|
दोडामार्गे चंदगड तालुक्यात येणारी गोवा बनावटीची दारू वाहतूकीवर निर्बंध घालण्याची – नितीन पाठक मागणी
चंदगड / कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीवर नाकाबंदी असूनही गोवा बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात दोडामार्ग – तिलारी घाट मार्गे चंदगड हद्दीत सुरु आहे.अवैधरित्या चंदगड तालुक्यात येणारी गोवा बनावटीची दारू व इतर आंमली पदार्थाची होणारी तस्करी बंद करावी, अशी मागणी चंदगडचे युवा कार्यकर्ते नितीन फाटक यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन दोडामार्ग चे पोलीस निरीक्षक अरूण पवार याना देण्यात आले आहे. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
महाराष्ट्र -गोवा-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगड तालुक्यात अवैध मार्गाने गोवा बनावटीची दारू व अमंली पदार्थ मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे.दोडामार्ग पोलीस ठाण्याअतंर्गत तिलारी पुनर्वसन वाडी येथे असलेल्या पोलीस चौकीला चुकवून दारू तस्कर दारूचा पुरवठा करत आहेत.याची पोलिसांना माहिती नसावी का असे फाटक यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे पाेलिसांचे हे नेमकं गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित करीत यावर फाटक यांनी कारवाईची मागणी केली? त्यामुळे चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखिल या निवेदनाची वेळीच दखल घ्यावी. दारू सप्लाय तातडीने बंद करावी, यावर आळा घालण्यात यावा, जेणेकरून अवैध धंद्यांना आळा बसेल.गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्री संदर्भात सिंधुदुर्ग व कोल्हापूर पोलीस अधिक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.अवैध दारू वाहतुकीवर कठोरात्मक कठोर कारवाई व्हावी,अन्यथा दोडामार्ग पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा फाटक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
|
 |
Post Views: 261