कृषी कन्यांनी दिली माहिती… शेतकऱ्यांनी अनुभवली कार्यशाळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

वडकशिवाले गावामध्ये सोयाबीन पिकावर कीड

कृषी कन्याकडून शेतकऱ्यांसाठी माहिती.

गगनबावडा:वडकशिवाले ता. करवीर येथे डॉ.डी वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे येथील कृषी कन्या  सिद्धी भोसले ऋतुजा मगदूम, क्षितिजा पाटील ,पूजा पाटील ,साक्षी निकम ,दिशा पाटील यांनी करपा रोगाचे नियंत्रण कसे करावे याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली सोयाबीन पिकाची लागवड वडक शिवाले गावात झाली आहे. परंतु सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पडला असून उत्पन्नात घट होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती वर्तवली जात होती त्यामुळे या सर्व कृषीकन्यांनी तांबेरा या रोगावर कोणती फवारणी योग्य रीतीने करावी हे सांगितले ,तांबेरा हा रोग सतत पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे प्रसारित होतो पानावर फिकट लालसर ते गर्द लालसर रंगाचे चट्टे पडतात ,पानांच्या मागील बाजूस लालसर तपकिरी रंगाचे पुरळ दिसून येतात अशा पुरळावर लालसर रंगाची पावडर जमा झालेली दिसून येते वाढ मंदावते ,पाने गळतात ,जमिनीच्या लगत खोड व मुख्य मुळे काळपट होऊन सडल्यासारखी दिसतात अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी सरपंच बळीराम पवार ,उपसरपंच दत्तात्रेय पारळेव इतर शेतकरी उपस्थित होते प्राचार्य .डी एन शेलार सर व प्राध्यापक एन. आर. कडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

खास तुमच्यासाठी ही सेवा…लाभ घ्या, गरजूंना सांगा

 

अनेक सवलती… तुमच्या हक्काची बँक आजच संपर्क साधा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.