पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
सांगली : १ ऑगस्ट रोजी देशभरासह सांगली जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. सांगली शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. उत्तम मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. समाजोपयोगी व सामाजिक उपक्रमांनी जयंतीला वेगळा साज चढवला. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले, “अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असूनही वाटेगाव येथे त्यांचे स्मारक झालेले नाही. काही जणांनी खोडसाळपणे न्यायालयात याचिका दाखल करून अडथळा निर्माण केला होता. आता न्यायालयाने स्मारक उभारण्यास हरकत नसल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेऊन स्मारक लवकर पूर्ण करावे. माझ्या वतीने मी स्वतःच्या खर्चाने कर्मवीर चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवणार आहे.”
डॉ. उत्तम मोहिते यांनी स्वागत केले. अभिमन्यू नाना भोसले, हर्षवर्धन पाटील, सतीश मोहिते, प्रशांत सदामते, धीरज सूर्यवंशी, फिरोज पठाण, राज्याक भाई, ज्ञानेश्वर केंगार, प्रथमेश शेटे, आम सिद्ध कट्टीमनी, संजय बेळगे, देवेंद्र पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्याध्यक्ष जितेंद्र हेगडे यांनी आभार मानले.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.